cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > घरगुती-सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग
National

घरगुती-सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग

CliQ INDIA
Last updated: August 26, 2025 6:40 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 25 ऑगस्ट (हिं.स.) – यंदाच्या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला. त्यामुळे उत्सवाचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाला आहे. वर्षभर बालगोपाळांसह सर्वच जण आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा हा गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने खुलल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी आकर्षक अशा पर्यावरणपूरक राजसिंहासन, मोर, अष्टविनायक मखराला ग्राहकांची पसंती असून लटकन, तोरण, गुलाबाचा पट्टा अशा सजावट साहित्यालाही मोठी मागणी आहे.

या आकर्षक आणि नवीनतम वस्तूंची जोरदार खरेदी सुरू असताना दुसरीकडे घरोघरी लहान मूर्तीच्या आगमनासाठी स्वच्छता, टापटीप, डेकोरेशन, नाविन्यपूर्ण मखरात विराजमान होण्यासाठी विविध रुपातील बाप्पांच्या मूर्तीही सजल्या आहेत. आता उद्या, मंगळवारी वाजत गाजत घरगुती गणपती स्थानापन्न होतील. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्ती तर आधीपासूनच मंडपात विराजमान झाल्या आहेत. आता केवळ भक्तांना सार्वजनिक दर्शनाची आतुरता लागली आहे.

मुंबईतील लालबागचा राजा, परळचा राजा, चिंतामणी, खेतवाडी, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती, अंधेरीचा राजा याशिवाय पुण्यातील मानाचे पाच गणपती – श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती, श्री केसरीवाडा गणपती यांसह राज्यभरात अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचे दर्शन आणि समाज उद्बोधक देखावे पाहण्यासाठी लांबून लांबून भक्त मुंबई, पुण्यात दाखल होतात.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, लालबाग, भुलेश्वर, लोहार चाळ, मस्जिद बंदर यांसह उपनगरातील बोरिवली, दहिसर, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड आदी ठिकाणच्या बाजारपेठा गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून गर्दीने फुलू लागल्या आहेत. घरगुती गणेशमूर्ती मखराचे सजावट साहित्य 400 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्या थर्माकॉल मखरांऐवजी इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची मागणी वाढत आहे. यावर्षी विठू माऊली, महालक्ष्मी देवी, शंकर, श्री स्वामी समर्थ, राज सिंहासन, मोर अशा रुपातील व राजमहल, राजमुद्रा, मोरपंख, बालाजी, गोल्डन टेम्पल अशा एक ना अनेक छोट्या व मोठ्या आकारांचे मखर बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया

इकोफ्रेंडली मखर हे टिकाऊ व मजबूत असल्याने लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. थर्माकॉलचे प्रमाण कमी झाले आहे. कोकणातील सर्वाधिक ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. रंगांचे दर वाढल्याने मखराच्या किंमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. – संजय जाधव, मखर विक्रेते, दादर

संदेश दबडे, सजावट साहित्य विक्रेते यांनी सांगितले की, यावर्षी लटकन, तोरण यांचे दर सुमारे 5 ते 7 टक्क्यांनी वाढले आहेत. पण विक्रीवर त्याचा परिणाम झालेला नाही.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

जयशंकरांची कॅरिबियन राजदूती: भारताच्या जामायका, सुरिनाम आणि ट्रिनिडाड व टोबॅगोसोबत संबंध बळकट
बेंगळुरूमध्ये चार मजली इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
राष्ट्रीय सुरक्षेचा भंग प्रकरणी सैन्य अधिकारी बडतर्फ
**केरळ, आसाम, पुडुचेरी विधानसभा निवडणुका ९ एप्रिलला; प्रमुख राज्यांमध्ये राजकीय संघर्षाची रंगत**
आसाम विधानसभा 2026 मध्ये कमी गुन्ह्यांची प्रकरणे पण कोट्याधीश आमदारांची वाढ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत ५ जण जखमी
Next Article ऋषीपंचमी : ऋषींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?