परभणी, 21 ऑगस्ट (हिं.स.) – जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित यंत्रणांसह नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू आहे. धरणातील जलसाठा दुपारी 12 वाजता 95.05 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील चालू आवक लक्षात घेता, धरणातून नियमाप्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. गोदावरी नदीच्या पात्रात येत्या 48 तासांत कोणत्याही क्षणी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांसह गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
