परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली झाली असून नूतन जिल्हाधिकारी म्हणून संजय चव्हाण यांची आज बुधवार( दि. २०) नियुक्ती झाली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी आदेश जारी केले आहे.
संजय चव्हाण हे मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांची परभणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली करण्यात आली आहे. परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय चव्हाण यांनी तात्काळ पदभार स्विकारण्याचे आदेश नियुक्तीपत्रात देण्यात आले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
