cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > पाकिस्तानला इशारा, देशाला जीएसटीचे 2 स्लॅब
National

पाकिस्तानला इशारा, देशाला जीएसटीचे 2 स्लॅब

CliQ INDIA
Last updated: August 16, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी मांडला भविष्याचा आराखडा

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्याहून दिलेल्या भाषणात त्यांनी भारत आता परमाणू धमक्या सहन करणार नाही असा इशारा पाकिस्तानला दिला. तसेच ऑपरेशन सिंदूरचे यश आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रांतील झपाट्याने होणाऱ्या प्रगतीबद्दल चर्चा केली. यासोबतच त्यांनी तरुणांसाठी रोजगार आणि जीएसटी सुधारणा सारख्या मोठ्या घोषणाही केल्या.

याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, या दिवाळीला देशवासीयांना एक मोठी भेट मिळणार आहे. सरकार जीएसटीमध्ये पुढील सुधारणा आणणार आहे. कर स्लॅब्स सोपे करण्याची आणि रोजच्या वस्तूंवर जीएसटी दर कमी करण्याची वचनबद्धता दिली आहे या दिवाळीला तुम्ही एक नवा आणि साधा जीएसटी ढांचा पाहाल, जो सामान्य माणसाचे जीवन सोपे करेल आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करेल असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 8 वर्षांत जीएसटीमध्ये मोठे सुधार झाले आहेत आणि आता या नवीन सुधारणा देशभरातील करांचे ओझे कमी करतील. हे पाऊल केवळ घरगुती वापर वाढवणार नाही, तर पारदर्शकता आणि नियमांचे पालनही सुनिश्चित करेल.

सुदर्शन चक्र मिशन

पीएम मोदींनी संरक्षण क्षेत्रातील एका नव्या योजनेचा उल्लेख केला, ज्याला त्यांनी सुदर्शन चक्र मिशन असे नाव दिले. त्यांनी सांगितले, पुढील दहा वर्षांत, २०३५ पर्यंत, आपला राष्ट्रीय सुरक्षा कवच आणखी मजबूत केला जाईल. श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रापासून प्रेरणा घेऊन आम्ही हा मार्ग निवडला आहे. या मिशनच्या अंतर्गत भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्या शहरांचे, सामरिक ठिकाणांचे आणि पवित्र स्थळांचे संरक्षण करेल. पीएम मोदींनी सांगितले, हे सुदर्शन चक्र आपली ताकद बनेल, तसेच कोणत्याही शत्रूंची षडयंत्रे उधळून लावेल.

0000000000000000000

युवांसाठी मोठी योजना

पीएम मोदींनी तरुणांसाठी एक मोठी योजना सुरू केली. त्यांनी सांगितले, आज 15 ऑगस्ट आहे आणि आजपासून आम्ही १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, जे तरुण खाजगी क्षेत्रात आपली पहिली नोकरी मिळवतील, त्यांना सरकार 15 हजार रुपये देईल.तसेच, जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल. पीएम मोदींनी दावा केला की या योजनेमुळे जवळपास 3.5 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत, ज्यामुळे तरुणांसाठी सुवर्ण संधी मिळेल.

अणू बॉम्बच्या धमक्यांविषयी कडक भूमिका

पंतप्रधान मोदींनी अणू बॉम्बच्या धमक्यांविषयी कडक भूमिका घेतली आणि सांगितले, भारत आता परमाणु ब्लॅकमेल सहन करणार नाही. आम्ही ठरवले आहे की अशा धमक्यांपुढे झुकणार नाही.

सिंधु जल संधीला अन्यायपूर्ण मानत त्यांनी सांगितले, खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. ही संधी आपल्या शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरली आहे, तर शत्रूच्या शेतांना पाणी मिळाले. हा कोणत्या प्रकारचा करार आहे?

आत्मनिर्भरतेवर भर

पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, भारत आता या संधीबाबत नवीन धोरण स्वीकारेल आणि आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई लढेल.आत्मनिर्भरतेवर जोर देत, पीएम मोदींनी सांगितले की, इतरांवर अवलंबून राहणे आपत्तीचा कारण बनू शकते. त्यांनी सौर, हायड्रोजन आणि परमाणु ऊर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठीची योजना सांगितली.

सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रगती

तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर भाष्य करत पीएम मोदींनी सेमीकंडक्टर क्षेत्रावर विशेष जोर दिला. त्यांनी सांगितले, सुमारे 50 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर कारखान्यांचा विचार झाला होता, पण त्याला दाबण्यात आले. आम्ही 50 ते 60 वर्षे गमावली. आता आम्ही मिशन मोडमध्ये काम करत आहोत. यावर्षाच्या अखेरीस मेड-इन-इंडिया चिप्स बाजारात येतील. एकवीसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा दबदबा असेल, आणि जो देश या क्षेत्रात पुढे असेल तोच यशस्वी होईल. भारत आता या मार्गावर जलद गतीने प्रगती करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

—————————

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

You Might Also Like

जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उपकरणे उत्पादकांमध्ये भारताचा समावेश – डॉ जितेंद्र सिंह
एमपीएससी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, महेश घाटुळे प्रथम | BulletsIn
मादागास्कर राष्ट्राध्यक्षपदी पुनर्निवड झाल्याबद्दल अँड्री राजोएलिना यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
माजी मुख्यमंत्री, कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन
समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भारत-पाकिस्तान युद्धासह आम्ही पाच युद्धे सोडवली – ट्रम्प
Next Article स्वातंत्र्यदिनी पॅरा शूटर निहाल सिंह ठरला गोल्डन बॉय !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?