cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > कोकणातील सामाईक ७/१२ धारक शेतकऱ्यांना हमीपत्राद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळणार
Regional

कोकणातील सामाईक ७/१२ धारक शेतकऱ्यांना हमीपत्राद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळणार

CliQ INDIA
Last updated: August 7, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

आलिबाग, 6 ऑगस्ट (हिं.स.)। पोलादपूर महाराष्ट्र शासनाने कोकणातील शेतकरी वर्गाच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भरत गोगावले यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे सामाईक ७/१२ धारक शेतकऱ्यांनाही हमीपत्राद्वारे वैयक्तिक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

कोकणातील बहुतांश शेतजमिनी या सामाईक स्वरूपाच्या असून त्यावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे आहेत. यामुळे खातेफोड न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली संमती मिळवणे कठीण होते. परिणामी, हे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहत होते.

भात हे कोकणातील प्रमुख पीक असून, पावसावर आधारित शेतीमुळे उत्पन्न कमी असते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडते. यावर उपाय म्हणून राज्य सरकार रोजगार हमी योजना, फलोत्पादन अभियान, तसेच कृषीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. मात्र, सामाईक सातबाऱ्यांमुळे अडचणी निर्माण होत होत्या.

या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महसूल सचिव, कृषी विभागाचे उपसचिव, रोजगार हमी योजनांचे सचिव, महासंचालक तसेच आमदार उपस्थित होते. या बैठकीत कोकणातील सामाईक सातबाऱ्यांच्या बाबतीत हमीपत्राद्वारे योजनांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निर्णयासाठी तीन दिवसांत शासन निर्णय (GR) काढण्याचे आदेश सचिवांना दिले. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांना आता खातेदारांची संमती न घेता हमीपत्राद्वारे योजनांचा लाभ मिळणार आहे.

या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, नामदार भरत गोगावले यांचे यामध्ये मोलाचे योगदान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant

You Might Also Like

जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक
बीड : सोयाबीनची ५३२८ रु.प्रति क्विंटल हमीभावाने शासकीय खरेदी
आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी – मुख्यमंत्री
सोलापूर – बळीराजाच्या बॅंक खात्यात भरपाई जमा होण्यास सुरवात
एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट, ६०० कोटींचा सामंजस्य करार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article टेस्लाचा गुरुग्राममध्ये विस्तार – Hindusthan Samachar Marathi
Next Article चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश; मिनिटाला ६० गोळ्या झाडणार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?