* १० ऑगस्टपासून डिलिव्हरी
ठाणे, 25 जुलै (हिं.स.) : एम.जी. सिलेक्ट हा जे.एस.डब्ल्यू एम.जी मोटर इंडियाचा लक्झरी ब्रँड चॅनेल आहे आणि त्याने जगातील सर्वात वेगवान एम.जी, म्हणजेच सायबरस्टर भारतात प्रथमच ठाणे शहरात लाँच करण्यात आली आहे. ठाणे येथील एमजीच्या सिलेक्ट या शो रूम येथे या गाडीची बुकिंग आज, २५ जुलैपासून सुरू झाली असून १० ऑगस्ट पर्यंत ग्राहकांना गाडीची डिलीव्हरी मिळणार आहे. सायबरस्टर ही ब्रँडच्या मोटरिंग वारशाचे प्रतीक असून भविष्याच्या दृष्टीने तयार केलेली आहे . सायबरस्टर ७४.९९ लाख रुपयांमध्ये नवीन बुकिंगसाठी आणि ७२.४९ लाख मध्ये पूर्व-आरक्षण करणाऱ्या (प्री-रिझर्व्ह) बुकिंगसाठी उपलब्ध आहे.
अनुराग मेहरोत्रा, व्यवस्थापकीय संचालक, जे.एस.डब्ल्यू एम.जी मोटर इंडिया म्हणाले, एम.जी सिलेक्ट येथे आम्ही अशा अनुभवांची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे ज्यामुळे भावना जागृत होतात, इच्छेला प्रेरणा मिळते आणि जागरूक गतिशीलतेकडे बदलाव करण्यास मदत होते. एम.जी सायबरस्टर ही त्या तत्त्वज्ञानाची सशक्त अभिव्यक्ती आहे. ही एक कार आहे ज्याची अभियांत्रिकी कामगिरी दर्शविण्यासाठी केली गेली आहे आणि त्याचे डिझाइन असे केले गेले आहे जेणेकरून ती लक्षात राहील. अनेकजण एकेकाळी रोडस्टरचे दिवास्वप्न पाहत असत. सायबरस्टर खुल्या रस्त्याचे स्वातंत्र्य आणि इलेक्ट्रिक भविष्याच्या विवेकासह त्या स्वप्नास वास्तविक रूप देत आहे.
बाहेरचा आणि आतला भाग
सायबरस्टरची आकृती शिल्पात्मक तर आहेच, सोबतच ती हेतूपूर्ण सुद्धा आहे. त्याच्या इलेक्ट्रिक सिझर डोअर्स आणि सॉफ्ट टॉप रूफमुळे भावना जागृत होतात. त्याचा 0.269 सीडी चा कर्षण गुणांक (ड्रॅग कोएफिशिअंट) हवाई गतीच्या निपुणतेचे प्रमाण देतो. चिन्हक हेडलॅम्प्स पासून कॅम्मबॅक रिअर आणि ॲक्टिव्ह एरो घटकांपर्यंत प्रत्येक भगात हेतू दिसून येतो. पुढील भाग (फॅसिया) विशेष एलईडी प्रकाश, कुशाग्र डीआरएल, आणि एक शिल्पबद्ध बोनेट याने परिभाषित केला असून मागील भाग सुरेलपणे पूर्ण रुंदीच्या एलईडी लाईट बारमध्ये अंतर्भूत केलेल्या इंडिकेटर्सने निमुळता होत आहे. पिरेली पी-झिरो टायर्स ची जोड असलेल्या 20 इंचाच्या हलक्या अलॉय व्हील्सची अभियांत्रिकी उत्कृष्ट पकड आणि कार्यक्षमतेसाठी केली गेली आहे.
आतील भाग हे जोशपूर्ण गुणधर्म प्रतिबिंबित करत आहे. रॅपअराउंड, ड्रायव्हर-केंद्रित कॉकपिटला भविष्यकालीन ट्रिपल-डिस्प्ले इंटरफेस ने स्थिरता देण्यात आलेली आहे- ज्यात केंद्रस्थानी 10.25-इंचाचे टचस्क्रीन आणि दोन 7-इंचाचे डिजिटल पॅनेल्स आहेत जेणेकरून वास्तविक काळातील वाहनाचा डेटा, मनोरंजन आणि सेटिंग्ज सहज उपलब्ध होतील. पीएम 2.5 फिल्टरेशनसह ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि ड्राइव्ह मोड्ससाठी स्टीअरिंगवर बसविलेले पॅडल शिफ्टर्स, बुद्धिमान कार्यक्षमता वाढवतात.
शाश्वत डायनामिका सुएड आणि प्रीमियम व्हेगन लेदर अपहोल्स्ट्री स्पर्शग्राही, उच्च दर्जाचा अनुभव प्रदान करतात, तर नॉइज कोमपेनसेशन कॉम्पेन्सेशन सोबत बोस® ऑडिओ सिस्टम खात्री करते की प्रत्येक वेळी गाडी चालविल्यावर एक तल्लीन करणारा आणि शुद्ध अनुभव लाभत आहे.
सायबरस्टर ही खालील चार भावदर्शी दुहेरी-रंग उठाव असलेल्या बाहेरील भागाच्या संयोजनांत उपलब्ध आहे
काळी रूफ असलेली न्यूक्लियर येल्लो
काळी रूफ असलेली फ्लेअर रेड
लाल रूफ असलेली अँडीज ग्रे
लाल रूफ असलेली मॉडर्न बीईज
कार्यक्षमता आणि सुरक्षा
सायबरस्टरच्या शिल्पबद्ध बाहेरील भागाखाली 510 पीएस आणि 725 एनएम टॉर्क प्रदान करणारी ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह पॉवरट्रेन देण्यात आलेली आहे. लाँच कंट्रोल मोड सक्रिय असल्यास, ही फक्त 3.2 सेकंदात 0 किमी/तासापासून 100 किमी/तासापर्यंत धावते. ही एक आंत्रिक कामगिरी दर्शविते. फक्त 110 मिमी मध्ये उद्योगातील सर्वात पातळ 77 किलोवॅटचा अत्यंत पातळ बॅटरी पॅक 580 किमीची एमआयडीसी प्रमाणित श्रेणी देऊ करत आहे आणि वजन वितरण व हाताळणीत मदत करत आहे. उन्नत थर्मल व्यवस्थापन प्रणाली दीर्घकालीन कार्यक्षमतेची खात्री करते. पूर्व फॉर्म्युला 1 अभियंता मार्को फैनेल्लो यांचे सस्पेन्शन आणि चेसिस प्राविण्य वापरून अभियांत्रिकी केलेल्या सायबरस्टर मध्ये डबल विशबोन सस्पेन्शन आणि 50:50 वजन वितरणाची वैशिष्ट्ये आहेत जी धारदार हाताळणी आणि रोजच्या आरामासाठी उत्कृष्ट आहेत. ब्रेम्बो 4-पिस्टन फ्रंट ब्रेक कॅलिपर्स 100 किमी/तास वेगाने धावणाऱ्या वाहनाला फक्त 33 मीटरमध्ये थांबवतात ज्यामुळे विश्वासार्ह ब्रेकिंग लाभते आणि हे त्याच्या कार्यक्षमतेशी जुळते.
सुरक्षा याच्या कणामध्ये समाविष्ट आहे. उच्च-सामर्थ्य असलेल्या एच-आकाराच्या पूर्ण क्रेडल रचनेमुळे आणि 1.83 चा स्टॅटिक स्टेबिलिटी फॅक्टरमुळे (एसएसएफ) सर्वोत्तम रोलओव्हर प्रतिरोध लाभण्याची खात्री मिळते. लेव्हल 2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स (एडीएएस), वास्तविक काळातील ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम आणि ड्युअल फ्रंट व कॉम्बिनेशन साइड एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल व इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक सामील वैशिष्ट्यांचा संच, एकत्रितपणे कार्य करतात जेणेकरून कामगिरी आणि सुरक्षा सहजपणे एकमेकांशी अनुरूप ठेवता येतात.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
