बीजिंग, 24 जुलै (हिं.स.)
भारताची
अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चायना
ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. सात्विक-चिराग
जोडीने इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि बागास मौलाना यांच्यावर सरळ
गेममध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला.
सात्विक
आणि चिराग या माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोडीने लवचिकता आणि
रणनीतिक कौशल्य या सामन्यामध्ये दाखवले. चांगझोऊ येथे झालेल्या दुसऱ्या फेरीच्या
चुरशीच्या सामन्यात आठव्या मानांकित इंडोनेशियन जोडीवर २१-१९, २१-१९ असा विजय या जोडीने मिळवला. ४६
मिनिटांच्या कडव्या लढतीनंतर हा विजय त्यांनी मिळवला.
जागतिक
क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या एचएस प्रणॉयसाठी हा सामना निराशाजनक ठरला. त्याला चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनविरुद्ध पराभव सहन करावा लागला.
पहिला गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर प्रणॉयला सहाव्या मानांकित बॅडमिंटनपटूच्या गती
आणि सातत्याशी झुंजावे लागले, आणि अखेर पुढील दोन गेममध्ये त्याला २१-१५, २१-८ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना
एकूण ६५ मिनिटे चालला.
प्रणॉय
बाहेर पडल्याने पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.तर सात्विक आणि चिरागने कामगिरीने सातत्य राखल्याने
पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान कायम आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या या
भारतीय जोडीचा पुढील फेरीत कांग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे या कोरियन जोडीशी
किंवा चीनच्या लियांग वेकेंग आणि वांग चांग यांच्यातील विजेत्या जोडीशी होणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
