वॉशिंग्टन, 23 जुलै (हिं.स.)
अमेरिकन
ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक समितीने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे. महिला गटात
ट्रान्सजेंडर महिलांना स्पर्धेत सहभागी होण्यापासून बंदी घातली आहे. या वर्षाच्या
सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी
आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
खेळाडू
सुरक्षा धोरणात सुधारणा करताना यूएसओपीसीने
म्हटले आहे की, युएसओपीसी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समिती आणि राष्ट्रीय
क्रीडा महासंघांसारख्या संबंधित संस्थांसोबत काम करणार आहे. यामुळे महिलांना
निष्पक्ष आणि सुरक्षित स्पर्धात्मक वातावरण मिळण्यास मदत होईल. जे कार्यकारी आदेश आणि टेड स्टीव्हन्स ऑलिंपिक आणि हौशी क्रीडा
कायद्यानुसार आहे.
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पुरुषांना महिलांच्या
खेळांपासून दूर ठेवणे या शीर्षकाच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. या
आदेशानुसार ट्रान्सजेंडर मुली आणि महिलांना
महिलांच्या खेळांपासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या
आदेशात केवळ शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील खेळांचा समावेश नाही. तर त्यात ट्रान्सजेंडर महिलांना
अमेरिकेत स्पर्धा करण्यासाठी व्हिसा नाकारण्याच्या सूचना देखील आहेत. ट्रम्प यांनी
असेही म्हटले आहे की, ते २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये ट्रान्सजेंडर
खेळाडूंना भाग घेण्याची परवानगी देणार नाही. या आदेशानुसार यूएस स्टेट डिपार्टमेंटला आयओसीवर त्यांचे
सध्याचे धोरण बदलण्यासाठी दबाव आणण्यास सांगितले आहे.जे सध्या ट्रान्सजेंडर खेळाडूंना काही
मानकांनुसार स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देते.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
