कोलंबो, 9 जुलै, (हिं.स.) श्रीलंका
आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका यशस्वीरित्या
पार पडली आहे. या मालिकेत कुसल मेंडिसने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२४
नंतर कुसल मेंडिस हा एकदिवसीय सामन्यात १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा
जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
कुसल
मेंडिसने आतापर्यंत सर्वाधिक ११४५ धावा केल्या आहेत. मेंडिसनंतर कॅरिबियन फलंदाज
केसी कार्टी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ९९२ धावा केल्या आहेत. या दोन क्रिकेटपटूंनंतर
मेंडिसचा सहकारी फलंदाज चरित अस्लंका तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०२४ पासून
एकदिवसीय सामन्यात ९८४ धावा केल्या आहेत.
तीन
एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेमध्ये श्रीलंकेने २-१ असा विजय मिळवला होता. या
मालिकेतील अखेरचा सामना ८ जुलै २०२५ रोजी पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय
क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. हा सामना श्रीलंकेने ९९ धावांनी जिंकला. लंकन
संघाच्या या विजयाचा शिल्पकार तिसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस ठरला
होता. त्याने १०८.७७ च्या स्ट्राईक रेटने ११४ चेंडूत १२४ धावांची शानदार शतकी खेळी
केली होती.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
