सातारा जिल्ह्यात आषाढ शुद्ध एकादशी मोठ्या धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक भक्तीभावात साजरी करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तांनी विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. यावर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजाचा मोहरम सण एकाच दिवशी आल्यामुळे साताऱ्यात धर्मसहिष्णुतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.
BulletsIn
-
आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाचा प्रारंभ झाला असून विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा, कीर्तन, भजनाचे आयोजन झाले.
-
साताऱ्यातील गवई विठ्ठल मंदिर, गोल मारुती मंदिर, पंचपाळे हौद दुर्गा मंदिर यासारख्या ठिकाणी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
-
मंदिरांमध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत षोडशोपचार पूजन, महाआरती, अलंकार पूजन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगले.
-
राजवाडा परिसरात उपवासाच्या खिचडीचा व राजगिरा लाडूचा प्रसाद मोफत वाटण्यात आला.
-
करहर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
-
मोहरम सणानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने ताबूत मिरवणुका, नवसाचे वाघ आणि सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आल्या.
-
सातारा शहरातील मंगळवार पेठ, खणआळी, सोमवार पेठ परिसरात भजन, प्रवचन आणि मंदिर सजावट विशेष आकर्षण ठरले.
-
मंदिरांसमोर तुळशी, बुक्का आणि सुवासिक फुलांचे स्टॉल्स उभारले गेले होते.
-
मिठाई दुकांनांवर उपवासासाठी लागणाऱ्या फराळाच्या पदार्थांची मोठी खरेदी झाली.
-
सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळात चातुर्मास कार्यक्रमांचा शुभारंभ सायंकाळी करण्यात आला.
