मुंबई, 5 जुलै (हिं.स.) गोदरेज लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्स ही कंपनी गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपचा भाग आहे. नुकतेच गोदरेज ल़ॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्स या कंपनीने भारतीय घरात नवनव्या सजावटीची उत्पादनांची आवड असणा-या ग्राहकांसाठी एचडीएच व्हॅव्ह ५ हे नवे हँण्डल उपलब्ध केले आहे. आज या उत्पादनांच्या अनावरणाची अधिकृत घोषणा केली. बाजारात दाखल झालेले नवे एचडीएच व्हॅव्ह ५ हे अत्याधुनिक स्वरुपाचे हँण्डल पूर्णपणे पितळेपासून बनवण्यात आले आहे.
एचडीएच २०,२१,२२ आणि २३ या चार नव्या स्वरुपात ही नवी उत्पादने उपलब्ध आहेत. या नव्या उत्पादनांमध्ये नवनवीन आणि आकर्षक रचनेत टिकाऊपणा आणि अचूक अभियांत्रिकी कल्पकतेचा योग्यरित्या समन्वय साधण्यात आला आहे. ही चारही डिझाइनमध्ये निओ लक्झरी, अर्बन चिक, युरो आणि मॉडर्न मिनिमलिझम यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय डिझाइनची झलक पाहायला मिळते. ही उत्पादने जागतिक सौंदर्य आणि भारतीय सुंदरता यांचा सुरेख मिलाफ घडवते. हे हँण्डल्स घरगुती डिझाइन, हॉटेल्स, कार्यालय आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी तयार करण्यात आली आहे.
चारही नवे हँण्डल्स हँण्डल आणि रोझ या घटकांसह घट्ट पितळेचा वापर करुन तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक हँण्डल टिकाऊपणाची खात्री देते. या उत्पादनाला ५ वर्षांची वॉरंटीदेखील आहे. या हँण्डलची तब्बल १ लाखांहून जास्त वेळा तपासणी करण्यात आली. हे हँण्डल्स उघडणे आणि बंद करणेही सोप्पे आहे. हँण्डल्सची गंजप्रतिरोधक क्षमता आणि विरघळणा-या पदार्थांची टिकाऊपणाची चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे हे नवे हँण्डल्स सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम संगम ठरतात.
बाजारात दाखल झालेले हे नवे हँण्डल्स अगदी चार हजार ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. या हँण्डल्सच्या उपलब्धतेमुळे गोदरेजने आपल्या ग्राहकांसाठी उत्युच्च दर्ज्याच्या सेवा उपलब्ध करुन दिल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. ही नवी उत्पादने आर्किटेक्ट्स, डिझायनर्स आणि डिझाइनची जाण असलेल्या ग्राहकांची आवड लक्षात घेऊन निर्माण करण्यात आली आहेत. हे हॅण्डल्स आधुनिक सजावटीतील भारतीय घरांना अजूनच चांगली शोभून दिसतील. नव्याने दाखल झालेले हँण्डल्स २८ मिमी ते ६० मिमीपर्यंतच्या दारांमध्ये सहज सामावले जातात. या हँण्डल्सच्या मदतीने दार बंद करताना वापरण्याचा अनुभव त्रासदायक नसतो. चारही नव्या हँण्डल्सम्ध्ये दार योग्य पद्धतीने बंद करताना आवश्यक लवचिकताही पाहायला मिळते.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
