वॉशिंग्टन डीसी, 21 जून (हिं.स.) :
इस्रायलला इराणवरील हवाई हल्ले थांबवण्यास
सांगणे कठीण असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगतले आहे.
या अधी युद्धामध्ये ट्रम्प यांनी एकतर्फी भूमिका स्वीकारत गाझामधील सततच्या
हल्ल्यांमध्ये इस्रायलला पाठिंबा दिला होता. दरम्यान,अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या
प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या की ट्रम्प प्रशासन इराण आणि इस्रायलमध्ये
युद्धबंदीसाठी दबाव आणेल की, नाही हे त्यांना सांगता येत नाही.
डोनाल्ड
ट्रम्प न्यूजर्सी येथील त्यांच्या गोल्फ कोर्सवर एका निधी संकलन कार्यक्रमात
उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, युरोप इराणशी बोलण्याचा
प्रयत्न करत आहे. पण इराण युरोपशी बोलू इच्छित नाही, तर थेट अमेरिकेशी बोलू इच्छित आहे. त्यामुळे युरोप या प्रकरणात फारशी मदत करू शकणार नाही.
गाझामध्ये
सतत होणाऱ्या हल्ल्यांसाठी अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरवत आहे.
इराणसोबतच्या तणावादरम्यानही त्यांनी असेच केले. मात्र, इराणने धमकी दिलीह होती की, जर अमेरिकेने इस्रायलसह थेट इराणवर हल्ला
केला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
