दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या जगप्रसिद्ध काॅम्रेड अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूरच्या वाघचवरे भावंडांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. ९० किलोमीटर अंतराची ही अतीकठीण शर्यत तिघांनी निर्धारित वेळेआधीच पूर्ण करत एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. ही मॅरेथॉन तीन भारतीय भावंडांनी एकत्रितपणे यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.
BulletsIn
-
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे ९८ वी काॅम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन नुकतीच पार पडली.
-
ही शर्यत ९० किमी लांबीची असून अत्यंत कठीण चढ-उतार, थंडी, ऊन आणि गार वाऱ्यांमधून जाते.
-
यावर्षी या जागतिक स्पर्धेत २५,००० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
-
भारतातून केवळ ४३० स्पर्धक पात्र ठरले होते.
-
या स्पर्धेमध्ये विशिष्ट वेळेच्या आत पाच टाईम कट-ऑफ पार करणे अनिवार्य असते.
-
सोलापूरच्या वाघचवरे भावंडांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेच्या आधीच पूर्ण केली.
-
ही मॅरेथॉन तीन भारतीय भावंडांनी एकत्र यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची इतिहासातील पहिली घटना ठरली आहे.
-
डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे (वाघचवरे) यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले.
-
डॉ. सत्यजित सत्यवान वाघचवरे आणि डॉ. अभिजीत सत्यवान वाघचवरे यांनी व्हीक क्लाफाम मेडल जिंकले.
-
अभिजीत वाघचवरे यांच्यासाठी ही दुसरी यशस्वी काॅम्रेड मॅरेथॉन ठरली आहे.
