नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलातील सिंथॅंटीक ट्रॅकवर वरिष्ठ गटातील पुरुष आणि महिलांसाठी जिल्हा मैदानी स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या विविध शर्यतींसह पुरुष गटातील विविध प्रकार पार पडले आणि अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
BulletsIn
-
पुरुष 200 मीटर धावणे:
-
हर्षल बच्छाव (एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमी) याने 22.81 सेकंदांत स्पर्धा जिंकली.
-
पियुष सोनार (रनर्स ९९, कळंब) याने दुसरे स्थान मिळविले.
-
-
पुरुष 400 मीटर हर्डल्स:
-
आदिवासी क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूने 54.90 सेकंदांत प्रथम क्रमांक पटकावला.
-
-
पुरुष उंच उडी:
-
शुभं दिघे (नाशिक क्रीडा प्रबोधिनी) याने 1.80 मीटर उडी घेऊन विजेतेपद मिळविले.
-
-
पुरुष ट्रिपल जंप (तीहेरी उडी):
-
व्ही.डी.के स्पोर्ट्स फौंडेशनचे श्रीजय पाटील, स्मित चौरे, व प्रज्वल अंडोरे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवून वर्चस्व राखले.
-
-
महिला 400 मीटर:
-
श्रावणी सांगळे (व्ही.डी.के स्पोर्ट्स फौंडेशन) हिने उत्कृष्ट धाव घेऊन विजेतेपद पटकावले.
-
-
महिला 400 मीटर हर्डल्स:
-
श्रावणी सांगळे हिने 1.09.16 मिनिटांत अंतर पूर्ण करून दुहेरी विजेतेपद प्राप्त केले.
-
-
महिला 800 मीटर धावणे:
-
रेखा शेवरे (दिंडोरी) हिने 2.21.63 मिनिटांत विजेतेपद मिळविले.
-
दिशा बोरसे दुसऱ्या क्रमांकावर.
-
-
महिला 1500 मीटर धावणे:
-
दिशा बोरसे हिने 5.05.68 मिनिटांत प्रथम क्रमांक मिळवला.
-
-
महिला 5000 व 10000 मीटर धावणे:
-
रविना गायकवाड (K.T.H.M कॉलेज) हिने अनुक्रमे 18.26.20 व 30.00.91 मिनिटांत दोन्ही शर्यती जिंकत दुहेरी यश मिळवले.
-
-
महिला लांब उडी व गोळाफेक:
-
प्रियांका भामरे (त्र्यंबकराज क्लब) हिने लांब उडीत प्रथम क्रमांक मिळवला.
-
हामंगी पंडित (गिरीराज क्लब) हिने 10.79 मीटर गोळाफेक करत विजेतेपद मिळवले.
-
