साताऱ्यात झी मराठीवरील नवीन मालिका ‘देवमाणूस – मधला अध्याय’ च्या प्रमोशनसाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी विशेष उपस्थिती लावली. संपूर्ण गावात या सोहळ्याचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. कार्यक्रमात सईने गावकऱ्यांशी संवाद साधत अनेकांना आपलंसं केलं आणि गोपाळच्या टेलरिंग शॉपचं उद्घाटन करत त्याच्या कार्याची प्रशंसा केली.
BulletsIn
-
झी मराठीवरील नवीन मालिका ‘देवमाणूस – मधला अध्याय’ च्या लाँचसाठी साताऱ्यात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
-
अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांची मने जिंकली.
-
गावातील हिम्मतराव टेलरिंग शॉप चं उद्घाटन सईच्या हस्ते करण्यात आलं.
-
संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला.
-
गोपाळच्या कुटुंबीयांनी सईचं मनापासून स्वागत केलं, आणि गोपाळने सईला स्वतः कार्यक्रमस्थळी आणलं.
-
हिम्मतरावांनी महिलांप्रती असलेल्या आदराची भावना व्यक्त करत, गोपाळला व्यवसायासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सांगितलं.
-
सरू आज्जीने आपल्या खास शैलीत संवाद साधून कार्यक्रमात हास्याची लहर निर्माण केली.
-
सई ताम्हणकरने गोपाळच्या कामाचं कौतुक करत त्याला मुंबईत दुकान सुरू करण्याचा सल्ला दिला आणि त्याची पहिली ग्राहक होण्याचं आश्वासन दिलं.
-
सईने सरू आज्जीचं कौतुक करत तिला आपली फॅन असल्याचं सांगितलं.
-
या कार्यक्रमाला मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत तसेच निर्माते संजय खांबे आणि श्वेता शिंदे देखील उपस्थित होते, ज्यांच्या ब्लाउजवर ‘देवमाणूस’ हे नाव शिवलेलं होतं.
