अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. दोन दरोडे आणि चार घरफोडी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे 1 लाख 19 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण 5 घरफोडी प्रकरणांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
BulletsIn
-
18 मे रोजी भोरवाडी येथील फिर्यादी किरण खैरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली.
-
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 441/2025 नुसार बीएनएस कलम 331(4), 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
-
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले.
-
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
-
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी राजेश अशोक काळे, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर यास ताब्यात घेण्यात आले.
-
राजेश काळे याने भोरवाडी गावच्या शिवारात साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचे दोन साथीदार राहुल भोसले आणि प्रदीप काळे सध्या फरार आहेत.
-
आरोपीने चोरीचे दागिने बाबा किसन शेंडगे यास विक्रीस दिल्याची माहिती तपासात समोर आली.
-
पोलिसांनी शेंडगे याला ताब्यात घेऊन 1 लाख 19 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
-
उर्वरित चोरीचे दागिने बेलवंडी येथील एका सोनारास विकल्याचे आरोपीने सांगितले.
-
आरोपी राजेश अशोक काळे याच्या विरुद्ध आधीपासून दोन दरोडे आणि चार घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो फरार होता, असे तपासात निष्पन्न झाले.
