मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील बनवार रस्त्यावर सिमरी गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. आज, दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बोलेरो वाहन पुलावरून घसरून नदीच्या कोरड्या पात्रात कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
BulletsIn
-
ही दुर्घटना दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बनवार रस्त्यावर सिमरी गावाजवळ घडली.
-
बोलेरो गाडी महादेव घाट पुलावरून खाली कोसळली.
-
अपघातात ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-
पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जबलपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
-
बोलेरोमधून एकूण १५ प्रवासी प्रवास करत होते.
-
प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली.
-
अपघातग्रस्त सर्व व्यक्ती जबलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
-
अपघातग्रस्त बोलेरोमधील प्रवासी कॅन्सरची औषधे घेण्यासाठी घाटपिपरिया गावातून परत जात होते.
-
पोलीस व प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले.
-
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
