श्री क्षेत्र तेर (जिल्हा धाराशिव) येथील श्री संत गोरोबा काकांच्या मंदिरातील प्रस्तावित महाद्वाराच्या (कमानीच्या) जागेबाबत महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटना अहिल्यानगरच्या वतीने बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासकीय पातळीवर निर्णय न झाल्यास, जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
BulletsIn
-
महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन सादर केले.
-
या शिष्टमंडळात डॉ. अशोक सोनवणे, विनायक राऊत, नितीन घोडके, पांडुरंग क्षीरसागर, गणेश डेंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-
सध्या कमानीचे उद्घाटन आ. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीजवळ झाले आहे.
-
या ठिकाणी पाण्याची टाकी व शिल्लक जागा असल्याने कमान मुरुड रस्त्यालगत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
-
श्री संत गोरोबा काकांच्या जुन्या मंदिराच्या पूर्व बाजूची भिंत अद्याप पूर्ण झालेली नाही.
-
प्रस्तावित महाद्वाराचे काम दक्षिण बाजूऐवजी पूर्व बाजूस करावे, अशी मागणी आहे.
-
मंदिराच्या पूर्व बाजूस पत्रव्यवहार करून सुद्धा शौचालय बांधले गेले असून, ते दक्षिण बाजूस हलवावे.
-
या मागण्यांसाठी माजी सरपंच महादेवजी खटावकर २ एप्रिल रोजी आमरण उपोषण करणार आहेत.
-
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ व अहिल्यानगर कुंभार समाज या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत.
-
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येऊन उपोषण करणार आहेत.
