‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या शुभम फिल्म प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. लग्न आणि नातेसंबंधांच्या बदलत्या संकल्पनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
