महाराष्ट्राच्या लोककलेला दीर्घ परंपरेचा वारसा आहे. मात्र अलीकडच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही ठिकाणी लोककलेला विभस्त स्वरूप आले आहे. हे टाळण्यासाठी आणि आपली अस्सल लोककला, लावणी काय आहे? हे तरुण पिढीला दाखवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
BulletsIn
- भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ चे आयोजन केले.
- महोत्सवाचे आयोजन अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या वतीने करण्यात आले होते.
- कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्दमावती, पुणे येथे झाला.
- महोत्सवात उपस्थित प्रमुख पाहुणे: अभिनेत्री मेघा धाडे, दत्तात्रय कोल्हे, शंतनू गंगणे, स्वानंदी बेर्डे, अभिनय बेर्डे, ऍड. केदार सोमण, ऍड. मंदार जोशी, कलाकार आणि निर्माते मंगेश मोरे, उद्योजक व निर्माते अमर शेठ गवळी.
- सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
- लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी सिमा पोटे नारायणगावकर, सुधाकर पोटे नारायणगावकर, अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या कार्यक्रमांनी महोत्सव रंगला.
- अकलूज लावणी महोत्सव विजेता ग्रुप जय अंबिका कला केंद्र, सणसवाडीची वैशाली समसापुरकर ग्रुपचा संगीतबारी कार्यक्रम सादर केला.
