लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर दिल्लीत बैठका सुरू झाल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर चर्चा करण्यात आली. यावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे की माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच खडसेंना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
BulletsIn
- लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला.
- दिल्लीत भाजपच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
- महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली.
- या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले.
- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
- भाजपमध्ये घरवापसी होताच खडसेंना मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.
- भाजपने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
- लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसीची घोषणा केली होती.
- रक्षा खडसे निवडून येताच एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होणार आहे.
- भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत सुचक विधान केले आहे.
- अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला नाही.
