मुंबई उपनगर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अमोल गजानन किर्तीकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), लता पांडुरंग शिंदे (अपक्ष), परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडी), सुषमा दयानंद मेहता (बहुजन मुक्ती पार्टी), सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टी), ह्दा धनंजय शिंदे (अपक्ष), गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्ष), श्रावण राजाराम इंगळे, संतोष माणिक रायबान (अपक्ष), प्रभाकर साधू (मिशन ऑल इंडिया जस्टीस पार्टी), संजीवकुमार अप्पाराव कालकोरी (अपक्ष), मनोज श्रावण नायक (राइट टु रिकॉल पार्टी) यांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली.
