भंडारा :- भंडारा वनविभागातील अड्याळ वनपरिक्षेत्रात वन कर्मचारी हे गस्तीवर असतांना एक संशयीत इसम मोटारसाईकने दिसुन आला.सदर इसमास थांबवुन चौकशी केली असता त्याच्या मोटारसाईकलच्या पेट्रोल टंकीवरच्या पॉकेट मध्ये एक लोखंडी काता व एक सुरा दिसुन आला. तसेच आणखी कसून विचारपूस केली असता रानडुक्कराची शिकार करण्यासाठी हे शस्त्र वापरले असल्याचे सांगितले. आरोपीचे नाव तेजाबसिंग कांचनसिंग रामगडे रा.झिरोबा टोली लाखांदूर असे आहे.त्यानंतर संशयीत आरोपीने सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे राहते घरी झिरोबा टोली येथे झडती घेतली असता आरोपीकडुन अस्वलाची दोन नखे जप्त करण्यात आली. आरोपीला मा.प्रथम श्रेणी न्यायालय लाखनी यांच्या समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
