नाशिक : नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या तीन महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे या दागिने चोरांनी एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिले आहे. तर एकाच दिवशी झालेल्या तीन घटनांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहर हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी राहणारे नागरिक नेहमी दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात असेच रविवारी सायंकाळच्या वेळेस शहरातील सीता गुंफा रामकुंड आणि साडव्यावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना आपले दागिने गमवण्याची वेळ आलेली आहे यातील पहिली घटना तिचा गुंफा येथे घडली असून या ठिकाणी कर्नाटकाहून आलेल्या 70 वर्षीय सुजाता लक्ष्मी या दर्शनासाठी रंगत उभा असताना त्यांची एक लाख रुपयांची चिंचोली तर दुसरी घटना रामकुंड परिसरात घडली आहे या ठिकाणी औरंगाबाद येथील विवेकानंद नगर मध्ये राहणाऱ्या शितल मुकेश वाकचौरे या महिला कुटुंबासह आले असताना गोदागाठीचे दर्शन करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 22 हजार पाचशे रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले तर तिसरी घटना सनव्या वरील देवीच्या इथे घडली असून या ठिकाणी नाशिक शहरातील इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या कांचन कदम या रात्री नऊ वाजता दर्शनासाठी आले असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स सोडून दिली त्यामध्ये मोबाईल रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एक लाख 23 हजार रुपये चोरून नेला आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
