अवैध उत्खनन करणारे 4 ट्रॅक्टर, 1 जेसीबी जप्त
गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये विना परवाना मुरूमाची अवैध रित्या उत्खनन होत आहे. याबाबत गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी यांना होताच त्यांनी आपल्या टीम सह पहाटे धाड टाकली. यावेळी घटनास्थळाहून 1 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
