मुंबई, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (जीसीपीएल) या नाविन्यपूर्णतेसाठी ओळखल्या जात असलेल्या आघाडीच्या उद्योन्मुख कंपनीने सप्लायर इनोव्हेशन डे चे आयोजन केले होते. कंपनीच्या पुरवठादार आणि भागीदारांमध्ये सर्जनशीलता, नाविन्य आणि शाश्वततेला चालना देण्याच्या हेतूने या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एफएमसीजी व्यवसायातील वेगवेगळ्या विभागांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्यासाठी व त्यांवर चर्चा करण्यासाठी प्लॅटफॉर्म देण्यात आला. विविध पुरवठादार आपली नाविन्यपूर्णता दाखवण्यासाठी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते.
सप्लायर इनोव्हेशन डे कार्यक्रमात संभाव्य भागीदार तसेच पॅकेजिंगचे साहित्य, परफ्युम्स, कच्चा माल आणि अशा विविध क्षेत्रातील आघाडीचे प्रमुख पुरवठादार सहभागी झाले होते. नाविन्याच्या कक्षा रूंदावण्याच्या समान ध्येयाने सहभागी झालेल्या पुरवठादारांसाठी नेटवर्किंग सेशन्स तसेच चर्चासत्रांचा समावेश करण्यात आला होता.
विपणन, आर अँड डी, विभागीय व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि उत्पादन विभागांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात संभाव्य नाविन्यपूर्ण संधी शोधण्याचे व भविष्यातील उपक्रम आखण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात शाश्वत पद्धती, तंत्रज्ञानाचा समावेश, प्रक्रिया माहिती, नाविन्यपूर्ण पॅकेजिंग आणि नाविन्यपूर्ण उत्पादने यांविषयी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. त्याशिवाय जीसीपीएल कशाप्रकारे शाश्वत विकासासाठी नाविन्याचा आधार घेत आहे आणि पर्यावरण, समाजिक व प्रशासकीय बाबींवर लक्ष केंद्रित करत वेगाने बदलत असलेल्या बाजारपेठेत आघाडीवर राहात याहे याविषयी माहिती देण्यात आली.
या उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (जीसीपीएल) भारत आणि सार्कसाठी उत्पादन पुरवठा संस्थेचे प्रमुख सौरभ झावर म्हणाले, ‘नाविन्य हा आमच्या कामकाजाचा मुख्य गाभा आहे. आमचा सप्लायर इनोव्हेशन डे भागिदारी व नाविन्यामुळे कंपनीचे यश, वेग आणि जगभरातील ग्राहकांना आपलीशी वाटणारी उत्पादने तयार करण्यासाठी चालना मिळते हे दर्शवणारा होता. वैविध्यपूर्ण पुरवठादारांचा सहभाग आणि यावेळी मांडण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांनी शाश्वत विकास व आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत आघाडीचे स्थान राखण्याची आमची बांधिलकी अधोरेखित केली आहे.’
सप्लायर इनोव्हेशन डे च्या दरम्यान एकत्रितपणे नाविन्यनिर्मितीचे महत्त्व ठळकपणे दर्शवण्यात आले. पुरवठादार वर्गाने अनोख्या पद्धती आणि सुविधा यावेळी मांडल्या. आतापर्यंत जीसीपीएलने कायम पुरवठादारांना आपल्या शाश्वत पद्धतीचा लाभ करून दिला आहे. आपल्या पुरवठादारांचे नियमित ईएसजी विश्लेषण, या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींची माहिती आणि क्षमता विकास हे जीसीपीएलच्या शाश्वत पुरवठा साखळी धोरणाचे अविभाज्य घटक आहेत.
