cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > बुलडाण्यात राज्य उत्पादन शुल्कची अवैध मद्य विक्रीवर कारवाई
Crime

बुलडाण्यात राज्य उत्पादन शुल्कची अवैध मद्य विक्रीवर कारवाई

CliQ INDIA
Last updated: March 29, 2024 11:18 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

बुलडाणा,  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीवर कार्यवाही सुरू केली आहे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात आतापर्यंत 42 गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कालावधीमध्ये विशेष मोहिम राबवून 42 गुन्हे नोंदविण्यात आले. यात 42 वारस गुन्हे नोंदवून 43 आरोपींना अटक केली आहे. तसेच 2 वाहनासह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य 119.61 लिटर, विदेशी मद्य 19.44 लिटर, रसायन सडवा 6979 लिटर, हातभट्टी 527 लिटर. बिअर 7.8 लिटर जप्त केले आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या खामगाव पथकाने सुनगाव शिवार, ता. जळगाव जामोद येथे दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा घातला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर छाप्यामध्ये 130 लिटर हातभट्टी, मोहा सोडवा 1200 लिटर, प्लास्टिक नळ्या 6 नग, पंधरा लिटर क्षमतेचे पतरी डबे 86 नग, जर्मन चरव्या 6 नग, 20 लिटर क्षमतेचे जार 5 नग, 10 लिटर क्षमतेचे 3 कॅन असा 59 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राजू नथ्थू बोबडे वय 55 आणि प्रशांत रत्नाकर राऊत, दोघेही रा. सुनगाव ता. खामगाव यांना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक व्ही. एम. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे, दुय्यम निरीक्षक डी. ओ. कुटेमाटे, जवान अमोल सोळंकी, गणेश मोरे, संजय जाधव यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक व्ही. एम. पाटील करीत आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून बंद पडलेले गोडाऊन, मंगल कार्यालये, हातभट्टी निर्मिती आणि जागा मालक, हातभट्टी विक्री, अवैध ताडी निर्मिती विक्री जागामालक, धाबे हॉटेल जागामालक, गुऱ्हाळ चालविणारे, रिकाम्या बाटल्या आणि पृष्ठांचे व्यावसायिक, ट्रॅव्हल्स, बस व्यावसायीक, केमिकल व्यापारी यांना एकूण 360 नोटिस बजावण्यात आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यावर निमखेडी आणि हनवतखेड, ता. जळगाव जामोद येथे या विभागाकडुन तात्पुरते चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग, तसेच विविध जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स यांची वेळोवळी भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटअॅप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

 

You Might Also Like

आरमोरी येथे युवतीला मारहाण करणाऱ्या दोघांना अठक | BulletsIn
मरीन ड्राइव्हवर महिलेची आत्महत्या; वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसाचा शूर प्रयत्न | BulletsIn
वैष्णवी प्रकरण : आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी | BulletsIn
ऑनलाइन जुगारातून करोडपती झालेल्या पीएसआयचं अखेर निलंबन
ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे पडले महागात; महिलेची लाखो रुपयाला फसवणूक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article टीबी विरोधात भारताची प्रगती: टीबी अहवाल २०२४चा एक निकटाचा दाखला
Next Article विजय कोंडके यांचा ”लेक असावी तर अशी” चित्रपट भेटीला
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?