पुणे, विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरून काही दिवसांतच प्रवासी वाहतूक सुरु होईल. वर्षात सुमारे एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होण्याचा अंदाज आहे. जुन्या टर्मिनलच्या तुलनेत ही संख्या १० लाखांनी जास्त आहे, मात्र त्या तुलनेत सुविधा वाढणार नसल्याने प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विमानतळ प्रशासन चेक इन काऊंटर वाढविणार असले तरी बॅगेज रिक्लेम बेल्ट व कस् किऑस्कची संख्या वाढण्याची गरज आहे.नव्या टर्मिनलवर ३४ चेक इन काऊंटर आहेत. जुन्या टर्मिनलवरही तेवढीच काऊंटर होती. जुने टर्मिनल बंद झाल्यावर प्रशासन ‘अरायव्हल गेट’च्या जागेत सुमारे १५ चेक इन काऊंटर सुरु करणार आहे. ही बाब चांगली आहे. दुसरीकडे जुन्या टर्मिनलमध्ये चार बॅगेज रिक्लेम बेल्ट, तर १५ कस् किऑस्क आहेत. नव्या टर्मिनलवर पाच बॅगेज रिक्लेम बेल्ट आहेत. ही संख्या एकने वाढली असली तरी कस् किऑस्कची संख्या वाढलेली नाही.
