सोलापूर गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना शहरातील भवानी पेठ, वैदूवाडी परिसरातील घरात व गोडावूनमध्ये तब्बल ९ लाख २८ हजार रुपयांचा साठा अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला.या प्रकरणी हा साठा बाळगणाऱ्या महांतेश सिद्राम गुब्याडकर (३७) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी रेणुका रमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रजनीगंधा पानमसाला, राजू इलायची सुपारी, बाबा नवरतन पानमसाला, बाबा १२० तंबाखू, शुध्द प्लस पानमसाला, विना लेबल पानमसाला, आरएमडी पानमसाला, एम सुगंधीत तंबाखू असा प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला. त्याची किंमत तब्बल ९,२८,७४५ रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
