रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्तांच्या जनसेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सचिव सुरेंद्र घुडे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. घुडे यांचे या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
