cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > महिलांच्या अब्रुपेक्षा व्होटबँक म्हत्वाची वाटणे दुर्दैवी- पंतप्रधान
International

महिलांच्या अब्रुपेक्षा व्होटबँक म्हत्वाची वाटणे दुर्दैवी- पंतप्रधान

CliQ INDIA
Last updated: March 2, 2024 2:13 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

कोलकाता : संदेशखालीतील महिलांच्या अब्रुपेक्षा व्होट बँकेला महत्त्व देऊन शहांजहा शेख सारख्याची पाठराखण करणे दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम बंगालच्या हुगळी इथल्या आरामबागमध्ये आज, शुक्रवारी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधान दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आज, शुक्रवारी झारखंडमध्ये विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केल्यानंतर ते पश्चिम बंगालला पोहचले. पश्चिम बंगालच्या हुगळी येथे 7200 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, आणि पायाभरणी केल्यानंतर आरामबाग येथे आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, टीएमसी नेत्याने संदेशखालीतील महिलांवर अत्याचाराची सीमा ओलांडली आहे. याविरोधात संदेशखालीच्या माता-भगिनींनी आवाज उठवला, ममता दीदींकडे मदत मागितली, त्या बदल्यात बंगाल सरकारने तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. संदेशखालीच्या या घटना लाजिरवाण्या आहेत. तब्बल दोन महिने मुख्य आरोपीला अटक झाली नाही. संदेशखाली येथे टीएमसीने महिलांसोबत केलेले कृत्य पाहून संपूर्ण देश संतप्त झाला आहे. या अत्याचारावर आयएनडीए- आघाडीचे नेते गप्प आहेत हे पाहून मला लाज वाटते. बंगालमध्ये केंद्रीय एजन्सींनाही काम करण्याची परवानगी नाही, टीएमसी त्यांच्या कामकाजाविरोधात संपावर बसली आहे. टीएमसी बंगालच्या विकासात पूर्णपणे अडथळा आहे. टीएमसीने राज्यातील गरिबांसाठी घरेही बांधू दिली नाहीत. केंद्राच्या लोककल्याणकारी योजनाही टीएमसीने बंद केल्या. भ्रष्ट, परिवारवादी आणि तुष्टीकरण करणाऱ्यांना पाठिंबा देणे हे काँग्रेस आणि ‘आयएनडीआयए’ आघाडीचे एकमेव काम आहे आणि हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे काम आहे. भारत खूप वेगाने प्रगती करत असून आम्ही 2037 पर्यंत विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण हे आमचे प्राधान्य आहे. गरिबांच्या विकासासाठी आपण अनेक पावले उचलली आहेत आणि त्याचे परिणाम जग पाहत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. हुगळी येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान उद्या, शनिवारी 2 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे पोहोचतील, जिथे ते 15 हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2.30 वाजता, बिहारच्या औरंगाबाद 21 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. नंतर पंतप्रधान बिहारमधील बेगुसराय येथे पोहोचतील जेथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

You Might Also Like

भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही संकेत नाही- क्रेमलिनचे प्रवक्ते
जागतिक-संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यात भारताचे सातत्यपूर्ण योगदान अत्यंत महत्त्वाचे- अँटोनियो गुटेरेस
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता
इराणमध्ये इंटरनेट बंद असताना हिंसाचार वाढला; आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू
हाँगकाँग आग : मृतांचा आकडा १४६ वर, हजारो लोक बेघर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चंद्रपूर : ताडोबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Next Article नेतृत्वाची कल्पना नव्या पद्धतीने | 2024 निवडणूकांच्या आधीच्या संध्याकाळी भूमिका स्तरावर लग्न
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?