नाशिक, फेब्रुवारी: कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमात आज दिनांक २९ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कार्य कर्तृत्वाचे यथार्थ चित्रण करणारा चित्रपट गोदाकाठचा महाकवी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असून कुसुमाग्रज स्मारक विशाखा सभागृहात हा चित्रपट गुरुवार दि. २९ फेब्रु. २०२४ रोजी सायं. ६ वाजता दाखविण्यात येणार आहे. कुसुमाग्रज प्रेमींनी या चित्रपटासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
