डोंबिवली, २१ फेब्रुवारी, : कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनजवळ एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. बुधवारी दुपारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने स्टेशन परिसराला पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला.
कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली. सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएसकडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये अंदाजे 54 डीटोनेटर (स्फोटके) मिळून आली. घटनास्थळी कल्याण लोहमार्ग पोलीस व बॉम्बशोधक पथक डॉग्स स्कॉट सह स्टेशनवर दाखल झाले.दोन संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.
