धुळे, 12 फेब्रुवारी : भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय) मार्फत एफ.ए.क्यु प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु करण्यात आली, आशी अशी माहिती कापूस पणन महासंघाचे, विभागीय व्यवस्थापक,जळगाव यांनी दिली.
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा,दोंडाईचा व नंदूरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व नवापुर अशा ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळ ( सी.सी.आय) मार्फत एफ.ए.क्यु प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. या व्यतिरिक्त सीसीआय मार्फ जळगांव जिल्ह्यात अंमळनेर, व धुळे जिल्ह्यात शिरपूर,धुळे अशा तीन केंद्रावर किमान हमी दराने कापूस खरेंदी केंद्र सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रासह नजिकच्या सीसीआयच्या केंद्रावर विक्री करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
