ठाणे, 11 फेब्रुवारी,
ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणार्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेतर्फे आयोजित श्री सत्यनारायण महापूजा व स्नेहमेळावा कार्यक्रम रायगडगल्ली, पाचपाखाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभही पार पडला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण पुंडलिक मोरे यांच्या स्वरतेज, मराठी वाद्यवृंद कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.
यावेळी ठाण्याचे मा. महापौर आणि शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार अॅड. निरंजन डावखरे, ठाणे शहर प्रमुख अशोक वैती, भामपा मा. नगरसेवक संदीप लेले, स्थानिक नगरसेविका रुचिता राजेश मोरे, उद्योजक विजय सागळे यांच्या ठाणे आणि सुधागड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचं स्वागत संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सल्लागार सुरेश शिंदे, रमेश सागळे, शिवाजी दळवी, जनार्दन घोंगे, गणपत डिगे, सरचिटणीस राजू पातेरे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव आदींनी केले. तर विठ्ठल खेरटकर, वसंत लहाने, प्रविण तेलंगे, बबन चव्हाण, अविकांत साळुंके, अजय जाधव, हरिश्चंद्र मालुसरे, श्याम बगडे, गजानन जंगम, दत्ता सागळे, अनिल चव्हाण, भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, रघुनाथ इंदुलकर, सुधीर मांढरे, चंद्रकांत बेलोसे, जयगणेश दळवी, सुनिल तिडके आदी पदाधिकार्यांसह सुधागड तालुका महिला मंडळ यांनी उपस्थिती दर्शविली.
