cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > आदिवासी समुदायांचा सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपत त्यांच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध – अर्जुन मुंडा
National

आदिवासी समुदायांचा सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपत त्यांच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध – अर्जुन मुंडा

CliQ INDIA
Last updated: February 12, 2024 10:59 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* घटना (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश आणि ओदिशामधील आदिवासी समुदायांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संसदेने मंजूर केलेल्या तीन विधेयकांबाबत आदिवासी समाजाचा सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपत त्यांच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे असे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे.

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील ‘पहारी वांशिक समूह, पडदारी जमाती, कोळी आणि गड्डा ब्राह्मण’ समुदायांना अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी संसदेने घटना (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) विधेयक, 2024 मंजूर केले. राज्यसभेने 9 फेब्रुवारी 2024 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशा संदर्भात घटना (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश, 1989 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर केले. त्याआधी, या विधेयकाला 6 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत मंजूरी मिळाली होती.

त्यापूर्वी, आंध्र प्रदेशा संदर्भात घटना (अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक, 2024 आणि ओदिशा संदर्भात घटना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक 2024 अनुसूचित जमातींशी संबंधित यादीमध्ये हे समावेश लागू करण्यासाठी लोकसभेने 8 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर केले होते. केंद्रीय आदिवासी व्यवहार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी लोकसभेत दुरुस्ती विधेयक मांडले. त्याआधी, 6 फेब्रुवारी 2024 रोजी हे विधेयक राज्यसभेने मंजूर केले होते.

देशातील आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मंत्री यावेळी म्हणाल्या. या विधेयकामुळे विशेषत: असुरक्षित आदिवासी समूहांना न्याय मिळेल असे त्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करण्यासाठी घटना (अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयक 2024 घटना (अनुसूचित जमाती) आदेश 1950 मध्ये दुरुस्ती करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये खालीलप्रमाणे समावेश केले जातील: –

आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातींच्या यादीत 25 व्या क्रमांकावर विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहात (PVTGs) असलेल्या ‘बोंडो पोरजा’ आणि ‘खोंड पोरजा’ चा समावेश.

आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातींच्या यादीत 28 व्या क्रमांकावर विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहात (PVTGs) असलेल्या ‘कोंडा सावराज’ चा समावेश.

ओदिशाशी संबंधित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या यादीत फेरबदल करण्यासाठी घटना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2024 घटना (अनुसूचित जाती) आदेश, 1950 आणि घटना (अनुसूचित जमाती) आदेश, 1950 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे.

विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाल्यावर जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश आणि ओदिशा मधील अनुसूचित जमातींच्या सुधारित यादीमध्ये नव्याने सूचीबद्ध केलेल्या समुदायांचे सदस्य देखील सरकारच्या विद्यमान योजनांतर्गत अनुसूचित जमातींना देय असलेले लाभ मिळवू शकतील.

आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या काही प्रमुख योजनांमध्ये मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजनांसह राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाकडून सवलतीच्या दराने कर्ज, अनुसूचित जमातीतील मुला-मुलींसाठी वसतिगृहे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय, सरकारी धोरणानुसार सेवांमध्ये आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाचे लाभ मिळवण्यासाठी देखील ते पात्र ठरतात.

You Might Also Like

पंतप्रधानांच्याहस्ते 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप | BulletsIn
चाणक्य संरक्षण संवादची सांगता : सहकार्यातून सुरक्षाविषयक आराखड्याला आकार देण्यावर भर
केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरोधातील दिल्ली उच्च न्यायालयाची अवमानप्रकरणी सुनावणी राजकीय लक्ष वेधून घेते.
नादब्रह्म कला केंद्रासाठी मोदींनी दान केली जमीन
उत्तराखंड : समान नागरी संहिता विधेयकाला मुस्लिमांचा विरोध

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचा स्नेहमेळावा संपन्न
Next Article किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची अंबड परिसरात हत्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?