cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : भाजपा आ. गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक
Crime

शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : भाजपा आ. गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

CliQ INDIA
Last updated: February 4, 2024 12:07 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

– गणपत गायकवाड यांच्या मुलासह तिघे फरार

कल्याण, 3 फेब्रुवारी  – उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील गंभीर जखमी झाले. महेश गायकवाड यांना लागलेल्या गोळ्या काढण्यात आल्या असून अधिक उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि इतर दोन जण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे साथीदार राहुल पाटील आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना चार, तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये शुक्रवारी रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्यात हाणामारी झाल्याचे प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

होय, मीच गोळीबार केला – गणपत गायकवाड

हा सर्व प्रकार ५० गुंठे जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे. अधिक माहिती अशी की, उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच गोळी झाडल्याची ही घटना घडली आहे. अशातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी होय, मीच गोळीबार केला, असं म्हणत गोळीबार केल्याचं मान्य केलं आहे. पोलीस ठाण्याच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल, तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली. मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. असेही गायकवाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही केले गंभीर आरोप

दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले.

 

You Might Also Like

अमरावती : परतवाडा शहरात क्रिकेट सट्टेबाजीची मोठी उलाढाल | BulletsIn
नाशिक : चालत्या रेल्वेत दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मोरक्यास सात वर्षांनंतर अटक | BulletsIn
सोलापुरातून दोन शाळकरी मुलींना फूस लावून नेले पळवून
ड्रग प्रकरणामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई
अमरावती : अतिक्रमणावरून दोन गट आपसात भिडले

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सप्रे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला रत्नागिरीत दिमाखात प्रारंभ
Next Article पार्श्वगायक शान यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ जाहीर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?