डोंबिवली, २ फेब्रुवारी : पार्किग केलेली मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकून गजाआड केले आहे. हे दोघे मु.पो. इब्राहिमपुर, ता. गदद्दीपुर जि.आझमगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली परिसरातुन १) कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी.(३८), २) विकम उदय चौहाण (४८), दोघेही रा. त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी, शेलारनाका यांना पोलिसांनी अटक केली. पूर्वेकडून सुशांत शशिकांत पालकर यांची मोटर सायकल कं. MH-06/BH – 8986 ही चोरीस गेली होती. पालकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना १ जानेवारी रोजी पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहा.पो.निरी. संदिप चव्हाण व पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. यातील कैलाश सुभाष जोशीवर कल्याण तालुका पोलीस ठाणे व मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
