अमरावती, 1 फेब्रुवारी :अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे होणार आहे.या क्रीडा स्पर्धेची नियोजन सभा गुरुवारला (ता.१) जिल्हा परिषद सायन्स स्कोर,मुलांची शाळा अमरावती येथे घेण्यात आली.यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,गटशिक्षणाधिकारी वकार अहमद,दीपक कोकतारे,रजनी शिरभाते, डी.सी.गायकवाड,संदीप बोडखे, विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर,शरद कान्हेरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी क्रीडा स्पर्धा उत्कृष्ठरित्या पार पडावी यासाठी विविध समितीच्या कर्तव्य व जबाबदारी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व आदींची उपस्थिती होती.यावेळेस काही खेळांचा नव्याने समाविष्ट करण्यात करण्यात आला असून काही खेळ वगळण्यात आली आहेत.वैयक्तीक व सांघिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे असे प्रसिध्दी समितीचे राजेश सावरकर,विनायक लकडे,शकील अहमद,किशोर रुपनारायण,श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
नव्याने समाविष्ट खेळ
कबड्डी मुली(माध्यमिक) रीले स्पर्धा, गोलाफेक, टेनिक्वईड (मुली) नव्याने समावेश करण्यात आला.
वगळलेले खेळ
तीन पायांची शर्यत, पोत्याची शर्यत, बटाटा शर्यत, चाटी रेस आदी खेळ वगळण्यात आले आहे.
