चंद्रपूर 24 जानेवारी (हिं.स.) : चंद्रपूरच्या शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे २६ जानेवारी संध्याकळी ६.३० वाजता“ भारत माता पुजन ” चा कार्यक्रम आहे. कार्यक्रमात शिवराज्यभिषेक ते राष्ट्रमंदिर या विषयावर व्याख्यान होणार असुन या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ. सतीश चाफले हे असून कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार हे असतील .
मंडळामार्फत नेहमी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येते व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारत मातेचे पुजन केले जाणार. त्यानंतर डॉ.सतीश चाफले यांचे व्याख्यान सादर होणार आहे .सर्व नागरिकांनी व युवा वर्गानी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून भारत मातेचे पुजन करावे व जाहीर प्रबोधनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
