रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं.स.) : राजापूरमधील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडित यांचे राहते घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने लांबविले आहेत.
काल, शनिवारी दुपारी अडीच ते रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या कालावधीत श्री. पंडुत घर बंद करून कळसवली येथे गेले असताना ही चोरी झाली. या प्रकरणी श्री. पंडित यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासासाठी श्वानपथक दाखल झाले आहे.
हिंदुस्थान समाचार
