सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूरच्या नगर कुंभारी परिसरातील रेनगरात साकारलेल्या असंघटित कामगारांच्या वसाहतीचे लोकार्पण केले. यावेळी राज्यपाल रमेशचंद्र बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पावार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
सोलापुरात साकारण्यात आलेले असंघटित क्षेत्रातील कामगारांची वसाहत ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. पंतप्रधान मोदींनी 9 जानेवारी 2019 रोजी या वसाहतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले होती. त्यानंतर अवघ्या 5 वर्षात त्याच वसाहतीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान आज, शुक्रवारी सकाळी 10.45 वाजेच्या सुमाराला सोलापुरात पोहचले. शहरातील नगर कुंभारी परिसरातील रेनगरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारलेल्या असंघटित कामगारांच्या घरकुल योजनेचे त्यांनी लोकार्पण केले. ही घरकुल योजना 350 एकर परिसरात असून यात 834 इमारती आणि 30 हजार फ्लॅट्स आहेत. ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावे. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. गेली 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा रे नगरटा हा भव्य प्रकल्प साकारला आहे. ही वसाहत म्हणजे केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापुरातील या वसाहतीच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान इतरही कामांची पायाभरणी आणि शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
