cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – सुधीर मुनगंटीवार
Regional

चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – सुधीर मुनगंटीवार

CliQ INDIA
Last updated: January 15, 2024 7:30 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

चंद्रपूर, १४ जानेवारी (हिं.स.) – महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या एकजुटीचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार करण्यासाठी एकत्र आलोय. आमदार, खासदार, मंत्री कुणीही झाले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हा उद्देश ठेवून पुढे मार्गक्रमण करावे, असे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) येथे केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद कडू, महायुती समन्वय प्रमुख देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष गौतम तोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिंदेंचा एस, फडणविसांचा एफ, पवारांचा पी… म्हणजे सुपर फास्ट प्रोग्रेस काम करत आहे. आपण महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून एकत्र आलोय. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आज एका वैचारिक भावनेतून एक स्वर, एक लक्ष्य अशी भूमिका मांडली. आपण विविध पक्षांचे असलो तरीही हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.’ समन्वय समितीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या समन्वय समितीचा मी देखील सदस्य आहे. समितीच्या बैठकीत मी जिल्हास्तरीय एकत्रीकरणासाठी आग्रही होतो. आज महाराष्ट्रात एकाच दिवशी महायुती एकत्र येत आहे, याचा आनंद होत आहे. एक सूर, एक लक्ष्य आणि एक दिशा हा भाव ठेवावा लागेल. त्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती नेमण्याची गरज आहे. यासोबतच युवकांची आणि महिलांचीही समन्वय समिती स्वतंत्र असायला हवी. विधानसभानिहाय एकरुपता यावी म्हणून ६ विधानसभांच्या तारखा निश्चित करून नियोजन आवश्यक आहे.’ चंद्रपूरमध्ये महायुतीच्या वतीने महिलांना एकत्र करून मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राहुल गांधी आले तरीही…

काँग्रेसचे लोक किंवा इतर विरोधी राजकीय पक्षांचे जेवढे लोक शिल्लक आहेत, त्यांच्याविरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. ही एकजूटता दाखवली तर राहुल गांधी चंद्रपूरमध्ये मुक्काम करून बसले तरीही काँग्रेसला जागा जिंकता येणार नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो, ही बाब लक्षात ठेवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

हमारा बुथ सबसे मजबुत

महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळ्या विचारांचा आहे, पण दिशा एकच आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाला एकमेकांचा राग आला तरीही तो महायुतीवर किंवा आपल्या पक्षावर काढायचा नाही, असा निर्धार करा. आपल्याला एकत्र येऊन समन्वय ठेवायचा आहे. ‘हमारा बुथ सबसे मजबुत’ हा भाव ठेवून काम करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश वाढविण्याची गरज आहे. आपला पक्ष आणि महायुती मर्यादित ठेवू नका. प्रत्येकाने विकासाची गाडी धावत राहील यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

विरोधकांकडे विकासाचा जाहीरनामाच नाही-

महायुतीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. विरोधी पक्षाकडे कुठलाही विचार नाही आणि विकासाचा जाहीरनामा नाही. सोशल मीडियावरील त्यांच्या विषारी प्रचाराला सत्यावर आधारित उत्तर देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

योजना लोकांपर्यंत पोहोचवा

केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या अनेक योजना आहेत. राज्यातील असो वा जिल्ह्यातील योजना असो, त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महायुतीच्या एकजुटीचा आदर्श

चंद्रपूर जिल्हा महायुतीच्या बाबतीत समन्वयामध्ये आदर्श ठरेल आणि इतर जिल्ह्यांना आपल्याकडून आदर्श घ्यावा लागेल, असे काम आपल्याला करायचे आहे, असा निर्धार करण्याचे आवाहन करतानाच चंद्रपूर जिल्ह्यात जिवतीपासून ब्रह्मपुरीपर्यंत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पिंपरी चिंचवड निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्रे पुरावे सादर करण्याचे रायगडकरांना आवाहन
विमानांची संख्या वाढण्यास लागणार महिना
हमाल, माथाडी कामगारांचा मोर्चा; सोलापूर मार्केट यार्डातील लिलाव बंद
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन सेवा सुरू!

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शेतकरी आणि लोकांचा विश्वासू भागीदार म्हणून भारतीय अन्न महामंडळाने पुढे यावे : पीयूष गोयल
Next Article राष्ट्रपती 15 ते 17 जानेवारी मेघालय आणि आसाम दौऱ्यावर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?