नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : भारत सरकारच्या डीआरडीओने डोंगराळ भागात वेगाने हालचाली करण्यास सक्षम असलेला जोरावर हा स्वदेशी रनगाडा बनवला आहे. या टँकच्या चाचण्यास सुरु झाल्या असून आगामी एप्रिल महिन्यापासून याच्या ‘यूजर ट्रायल्स’ घेतल्या जाणार आहेत. तसेच भारतीय सैन्याकडून देखील या रनगाड्याची चाचणी केली जाणार आहे.
डीआरडीओ आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हा नवा रणगाडा तयार केला आहे. या रणगाड्याच्या चाचण्या वाळवंट आणि उंचावरील ठिकाणी करून डिसेंबरपर्यंत भारतीय सैन्याला हा रणगाडा सोपवण्यात येणार होता, मात्र जर्मनीकडून इंजिन पुरवठा होण्यास विलंब झाल्याने याला विलंब झाला. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्वदेशी हलक्या लढाऊ रणगाड्यात इंजिन बसवण्यात आले आहे. या रणगाडा 100 किलोमीटरपर्यंत चालवून पाहण्यात आलेला आहे. भारतीय सैन्याकडून डीआरडीओला 59 जोरावर रणगाडे बनवण्याची ऑर्डर दिली होती. या रणगाड्याचे प्रारूप आणि डिझाईन डीआरडीओने तयार केले आहे. भारतीय लष्कराला 259 हलके रणगाडे हवे आहेत.भारतीय लष्कराला लडाख सारख्या उंच भागात शत्रूशी दोन हात करण्यासाठी 354 हलक्या रणगाड्यांची आवश्यकता आहे. यापैकी लार्सन अँड टुब्रो आणि डीआरडीओ हे 59 रणगाडे तयार करणार आहेत. तर उर्वरित रणगाडे तयार करण्यासाठी भारतीय कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहेत. हा रणगाडा ए-बन इंटिग्रेटेड, ड्रोन युद्ध क्षमता आणि सक्रिय संरक्षण प्रणाली यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.
हा रणगाडा 25 टन वजनाचा आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर द्वारे देखील हा रणगाडा सीमेवर काही वेळेत तैनात करता येणार आहे. या रणगाड्यात 120 किमी प्रतीतास वेगाने धावू शकतो. यात स्वयंचलित लोडर गण देण्यात आली आहे. एक रिमोट वेपन स्टेशन असून यात 2.7 एमएम हेव्ही मशीन गन देखील लावली जाणार आहे. या सोबतच जोरावरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, ऍक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, हाय डिग्री ऑफ सिच्युएशनल तसेच क्षेपणास्त्र डागण्याची क्षमते सोबतच शत्रूचं ड्रोन शोधण्यासाठी आणि ते पाडण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. जोरावर हे एक आर्मर्ड फायटिंग व्हेइकल आहे. शत्रूने कोणत्याही शस्त्राने हल्ला केला, तरीदेखील या रणगाड्यामध्ये असलेले जवान सुरक्षीत राहतली, असा दावा डीआरडीओने केला आहे.
हिंदुस्थान समाचार
