मुंबई, ११ जानेवारी (हिं.स.) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पुणे – जबलपूर उत्सव विशेष ट्रेनच्या फेऱ्या सुधारित संरचनेसह वाढवणार आहे.
पुणे-जबलपूर स्पेशल – २४ फेऱ्या
02131 पुणे-जबलपूर अतिजलद विशेष गाडी १५ जानेवारीपर्यंत प्रत्येक सोमवारी चालवण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता १ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. (१२ फेऱ्या)
02132 जबलपूर- पुणे अतिजलद विशेष गाडी १४ जानेवारीपर्यंत दर रविवारी चालवण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. (१२ फेऱ्या)
सुधारित संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय आसनसह गार्ड ब्रेक व्हॅन – (१७ डबे) ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ आणि थांबे यात कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण: विशेष रेल्वे क्रमांक 02131 च्या विस्तारित फेऱ्यांचे बुकिंग आज, गुरुवारी ११ जानेवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर http://www.irctc.co.in सुरू होईल.या विशेष गाडीच्या थांब्यावरील सविस्तर वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ऍप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार
