मुंबई, 9 जानेवारी, (हिं.स.) सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा गायन रियालिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’ आपली तिसरी आवृत्ती घेऊन येत आहे. देशातील छोट्या उगवत्या प्रतिभावंतांना त्यांचे गान कौशल्य सादर करण्यासाठी राष्ट्रीय मंच प्रदान करण्यास सज्ज असलेले निर्माते सुमधुर आवाजांच्या शोधात आहेत आणि लहान मुलांना या गायन सफरीवर येण्यास आमंत्रित करत आहेत, जेणे करून या मुलांना आपले कौशल्य अधिक सुधारण्याची संधी मिळेल.
सोनीने स्वतः तयार केलेल्या या रियालिटी शो फॉरमॅटच्या तिसऱ्या सीझनच्या ऑडिशन 17 जानेवारी रोजी भुवनेश्वरला सुरू होत आहेत. त्यानंतर 19 जानेवारी रोजी गुवाहाटी, 21 जानेवारी रोजी कोलकाता, 23 जानेवारी रोजी लखनौ, 25 जानेवारी रोजी चंदीगड, 28 जानेवारी रोजी दिल्ली आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे ऑडिशन होतील.
सुपरस्टार सिंगरच्या तिसऱ्या सीझनमध्ये सलमान अली, मोहम्मद दानिश, सायली कांबळे, अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन पुन्हा दिसणार आहेत. पुन्हा एकदा या शो मध्ये सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करताना अरुणिता कांजीलाल म्हणाली, “सुपरस्टार सिंगरच्या आगामी सत्राबाबत माझ्या मनात खूप उत्सुकता आणि उत्कंठा आहे. या मंचावरून नवनवीन प्रतिभावान कलाकार पुढे येत असतात आणि प्रत्येक वर्षी देशातील वेगवेगळ्या प्रांतांमधून वेगवेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले स्पर्धक आपली प्रतिभा या मंचावर सादर करण्यासाठी सहभागी होत असतात. ऑडिशन लवकरच सुरू होत आहेत, त्यामुळे अनेक उत्तम कलाकार यंदाही समोर येतील अशी आशा आहे. स्वतः झळकून आपले संगीताबाबतचे वेड समस्त जगाशी शेअर करण्याची ही संधी आहे. त्यामुळे, या ऑडिशनमध्ये अवश्य या आणि आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करा.”
लिंक: https://www.instagram.com/reel/C1vrlG7qeOI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
या ऑडिशनमध्ये अचूकपणे सहभागी होऊन देशाचा आगामी सुपरस्टार सिंगर बनण्यासाठी सज्ज व्हा!
हिंदुस्थान समाचार
