नाशिक, ३१ डिसेंबर, (हिं.स.) – मालेगाव तालुक्यातील गिगाव फाट्याजवळ एका ओमिनी गाडीतून गोमांस घेऊन जात असताना गोरक्षकांनी ही गाडी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे.
याबाबत समजेलली माहिती अशी की, गोमांस घेऊन जाणा-या ओमनी कारचा एम .एच. 20 सी एस ,4333 मध्ये गोमांस असल्याची माहिती प्राणी मित्र फाऊंडेशन व गोरक्षकांना मिळाली. त्यानंतर या पाठलाग करत ही कार पकडण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळण्याच्या नादात कार रस्त्याच्या कडेला उतरली. ही गाडी रस्त्याच्या खाली उतरताच कारची तपासणी केली असता कॅरेटच्या खाली काळ्या ताडपत्री खाली गोमास लपविलेले आढळून आले. मालेगाव तालूका पोलिस घटनास्थळी पोहचत गोमासासह एका युवकाला ताब्यात घेण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
