मुंबई, २० डिसेंबर, (हिं.स) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुझफ्फरपूर दरम्यान ४ विशेष साप्ताहिक अतिजलद ट्रेन सेवा चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे:-
लोकमान्य टिळक टर्मिनस – मुझफ्फरपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४ फेऱ्या)
०५२८२ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी दि. २३.१२.२०२३ आणि दि. ३०.१२.२०२३ रोजी २१.०० वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी मुझफ्फरपूर येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
०५२८१ अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी दि. २२.१२.२०२३ आणि दि. २९.१२.२०२३ रोजी दर शुक्रवारी १३.०० वाजता मुझफ्फरपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र जंक्शन, हाजीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर जं.
संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित – तृतीय, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅन ५ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण – २३ डब्बे)
आरक्षण: ०५२८२ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कावर बुकिंग सर्व PRS केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. २१.१२.२०२३ रोजी उघडेल.
सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार
