पुणे, 17 डिसेंबर, (हिं.स) ”सहकरी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारने काही मर्यादा दर्शवणारा निर्णय घेतला होता. मात्र त्या संदर्भात सुधारणा करून निर्णय मागे घेतला असला तरी या निर्णयात अनेक त्रुटी आहेत.यासंदर्भात तसेच कांदा व इतर प्रश्नाबाबतही नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. १८) केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी चर्चा करणार आहे”. अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ”देशातील सहकारी साखर कारखान्यांचे साखर उत्पादन कमी झाले आहे. साखर उत्पादनात वाढ होण्यासाठी कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार नाही. असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
हिंदुस्थान समाचार
