मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.) – ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’च्या १२व्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. या पर्वामध्ये २,३४,०९० अभ्यागत, १२८० प्रदर्शकांची नोंद झाली. यामध्ये चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी व मलेशिया यांसह २० विभिन्न देशांमधील ७० परदेशी प्रदर्शकांचा समावेश होता. प्रदर्शकांनी अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान व सामानांचे प्रदर्शन दाखवले. १,००,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याव्यतिरिक्त इव्हेण्टने व्यवसायामधील ५००० कोटींचे डिल्स केले. २६ देशांमधील १०१ ग्राहकांसह प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ मध्ये पहिल्यांदाच रिव्हर्स बायर अॅण्ड सेलर इंटरअॅक्शन्स पाहायला मिळाल्या. मोठ्या भारतीय कंपन्या जसे रिलायन्स, HPCL, IOCL आणि जेएसडब्ल्यू ग्रुप यांनी प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ मध्ये उपस्थिती दाखवून इव्हेण्टची शोभा वाढवली.
प्लास्टिव्हिजन इंडियाच्या गौरवशाली इतिहासाबाबत मत व्यक्त करत ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) चे अध्यक्ष श्री. मनिष देढिया म्हणाले, ”गेल्या तीन दशकांपासून प्लास्टिव्हिजन इंडियाने उद्योगातील दिग्गज, उद्योजक, ग्राहक व उत्साहींना एकत्र आणण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून सेवा दिली आहे, तसेच भारतीय प्लास्टिक्स उद्योगासाठी देशांतर्गत व प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील विकास संधींचा फायदा घेण्यास मदत करत आहे. या प्रवासात AIPMA ने आपल्या वाढत्या पाठिंब्यासह प्रमुख उत्प्रेरक म्हणून सेवा दिली आहे आणि खरेतर भारतीय प्लास्टिक्स उद्योगांना सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांचे निराकरण करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. ही पार्श्वभूमी पाहता प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ च्या यशाचे श्रेय AIPMA चे सदस्य आणि ४ दशलक्षहून अधिक सहयोगी समुदायाला देणे योग्य आहे.”
NAB आणि प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अरविंद मेहता म्हणाले, ”सहभागी सदस्य व व्यवसायांना मोठ्या व्यवसाय संधी देण्यासाठी १० विशिष्ट प्रदर्शक श्रेणींना पाठिंबा देण्यासह प्लास्टिव्हिजन इंडियाच्या १२व्या पर्वामध्ये रिव्हर्स बायर-सेलर मीट देखील पाहायला मिळाली, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी संभाव्य सहयोगांसाठी एमएसएमईंसह भारतीय कंपन्यांसोबत परस्परसंवाद साधला. प्लास्टिव्हिजन इंडिया २०२३ ने प्लास्टिक प्रक्रियाकर्ते, मोल्ड उत्पादक, पॅकेजिंग कंपन्या, उत्पादक, उदयोन्मुख उद्योजक, उद्योग आणि शैक्षणिक व्यावसायिकांसाठी नवीन व्यवसाय व नेटवर्किंग संधींना देखील अनलॉक केले.”
देशांतर्गत प्लास्टिक्स उद्योगाचे महत्त्व सांगत NEC-प्लास्टिव्हिजन इंडियाचे अध्यक्ष श्री. हरपाल सिंग म्हणाले, ”भारतीय प्लास्टिक उद्योग आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील आघाडीच्या क्षेत्रांपैकी एक आहे आणि या उद्योगाने निश्चितच मोठी प्रगती केली आहे. या उद्योगामुळे देशभरातील ४ दशलक्षहून अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, तसेच एकूण उत्पादित आऊटपुटमध्ये जवळपास ९० टक्के वाटा असलेल्या लघु व मध्यम उद्योजकांद्वारे या उद्योगाचे कार्यसंचालन पाहिले जाते. भारत सरकार विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत उत्पादनाला पाठिंबा देत आहे, भारतीय प्लास्टिक्स उत्पादक विद्यमान दशकाच्या अखेरपर्यंत १० लाख कोटी रूपयांचा (१२६ बिलियन अमेरिकन डॉलर्स) महसूल पार करत विद्यमान आर्थिक स्थितीमध्ये तिप्पट वाढ करण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व शाश्वत प्रक्रियांना चालना देणे महत्त्वाचे ठरेल आणि प्लास्टिव्हिजन इंडिया विकास व अध्ययन संधींना चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे, ज्यामुळे भारताला भविष्यात जागतिक प्लास्टिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीकोनाला पाठिंबा मिळेल.”
आपले मत व्यक्त करत प्लास्टिव्हिजन इंडियाचे को-चेअरमन डॉ. आशुतोष गोर म्हणाले, ”संपूर्ण विश्व शाश्वत साहित्याला चालना देण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना जगभरातील उद्योजक नवीन तंत्रज्ञान व उत्पादनांचा शोध घेत आहेत, जे प्लास्टिक्स उद्योगाचा शाश्वतता दर्जा वाढवत आहेत. भारतातील स्थितीसंदर्भात तरूण टेक्निकल टॅलेंट आणि व्यवसाय समविचारींनी आधुनिक हस्तक्षेप व प्रगतींबाबत जाणून घेणे, तसेच सर्वोत्तम मूल्य तत्त्वासह जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करण्यासाठी किफायतशीर इंजीनिअरिंग संकल्पनांचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे.”
उद्योग व नेटवर्किंगच्या दृष्टीकोनातून प्लास्टिव्हिजन इंडियाचे महत्त्व सांगत NEC, प्लास्टिव्हिजन इंडियाचे को-चेअरमन श्री. चंद्रकांत तुरखिया म्हणाले, ”भारतीय प्लास्टिक्स उद्योगाच्या उज्ज्वल भविष्याबाबत कोणतीच शंका नाही, पण उद्योगक्षेत्रांमध्ये व्यवसाय, अध्ययन व नेटवर्किंग संधी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी विविध प्लास्टिक्स विभागामधील मोठे भारतीय व्यवसाय, एमएसएमई, तसेच जागतिक प्रमुखांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परस्परसंवाद घडवून आणणे गरजेचे आहे. प्लास्टिव्हिजन इंडिया भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्याचे उद्दीष्ट संपादित करण्यामध्ये यशस्वी ठरले आणि आता भावी पर्वांसाठी बेंचमार्क म्हणून सेवा देईल.”
AIPMA च्या प्लास्टिव्हिजन इंडियाला रसायने व खते मंत्रालय, रसायने व पेट्रोकेमिकल्स विभाग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांचा पाठिंबा आहे. तसेच ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’ हे पॅरिसमधील प्रमुख जागतिक संस्था यूएफआय आणि प्रदर्शन उद्योग प्राधिकरणाकडून मान्यता असलेले प्लास्टिक उद्योगामधील एकमेव व्यापार मेळावा प्रदर्शन आहे. भारतातील प्लास्टिक्स उद्योगासाठी वाढीच्या उपक्रमांना चालना देणरी सर्वात मोठी ना-नफा तत्त्वावर आधारित सर्वोच्च संस्था असलेली AIPMA विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार्स, व्याख्याने, मीटिंग्ज, परिषदा, ग्राहक-विक्रेता बैठका आणि प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करते.
हिंदुस्थान समाचार
